Saturday, 11 July 2020

वर्षा



वर्षातील काही दिवस
असते आमुची तिजोरी भरलेली
अगदी काठोकाठ,
सुवर्णधाराच जणू बरसतात आम्हावर
एका मागून एक लागोपाठ !

वर्षातील काही दिवस
हिरवाईला जणू येतो मोहर,
सृष्टीच म्हणते लाजून 
हा डामडौल थोडा तरी आवर !
एक एक तृण अन पाती 
बनते थोडीशी धीट,
सडपातळच जरी
नाही कोणास भीत !

वर्षातील काही दिवस
सुखाला उरत नाही पारावार,
धुंद डुंबत असतो आम्ही
सुवर्ण डोहात वारंवार  !
साम्राज्याचे वैभव पाहून
फुलू पाहतो माझा श्वास,
थोड्या दिवसांचा का होईना
राजा असल्याचा होतो मज भास ! 

22 comments:

  1. निसर्गाच्या जवळ गेलो की, अशी प्रतिभाशक्ती वाढते. तुझे साम्राज्याचे वैभव सतत फुलून जाऊ दे...
    तू थोड्या दिवसाचा का.........
    तू नेहमीच निसर्गाचा राजा ....!


    अतिशय सुरेख

    ReplyDelete
  2. सुंदर आहे

    ReplyDelete
  3. वा बळवंतराव वा !!

    ReplyDelete
  4. छानच! 👌

    वर्षावर केलेली कोटी फिट बसतेय !

    ReplyDelete
  5. व्वा। सुंदर 👍

    ReplyDelete
  6. Sunder lihile aahes... Akash.
    .keep it up. .

    ReplyDelete
  7. Waah...farach sundar.
    Nisarg Veda tu,tyachya sanidhyat rahun tyatil badal achuk tipnara tu.kharach panavr baslelya kidyachya manatil bhavna kaviterupi shabdat kiti sundar bandhaliyes!tuzi pratibha ashich khulat raho hech subhechya.keep it up🙂

    ReplyDelete
  8. Really nice...👌👌👌

    ReplyDelete
  9. कवी मनाच्या या प्रज्ञेला
    आकाश रुपाचे विचार लाभो...
    श्रावणातल्या सोनपिवळ्या उन्हासारखे
    कवी मनाला दिवस यावेत...
    गर्द हिरव्या हिरवळी वरील
    दवबिंदू चे मोती व्हावेत...
    हिच सदिच्छा

    ReplyDelete
  10. अतिशय सुरेख ������

    ReplyDelete