एका मित्राशी असाच फोनवर गप्पा मारत बसलो होतो आणि तीने सहज विचारले "तू काहीतरी लिहलं होतंस ना..? मराठीमध्ये ? दोन दिवस तो कागद घेऊन ऑफिस मध्ये नाचत होतास! " हं! आठवलं .. तो दिवस होता ३१ डिसेंबर २०१५ आणि आम्ही म्हणजे मी आणि माझे दोन ऑफिस सहकारी मेहुल आणि सोनम नजर रोखून बसलो होतो नववर्षाच्या १ तारखेवर. १ तारखेला काहीतरी 'तुफ़ानी' करायचं एवढचं डोळ्यासमोर ! 'तुफानी' म्हणजे 'ट्रेक' ! सध्या पुण्यात असलेला अनुभवी आणि अस्सल ट्रेकर प्रसाद तांदळे आमच्या मोहिमेची आखणी करणार होता, प्रसाद बरोबर आहे म्हणजे आम्ही सर्व उताणे, निर्धास्त ! ३१ तारखेला ऑफिस उरकून आणि बस ब्रेकडाउन इत्यादी आव्हानांना तोंड देत रात्री १० - ११ च्या सुमारास आम्ही तीन मावळे लोणावळ्याच्या बस मध्ये स्वार झालो. बरोबर १२ वाजता जेव्हा सर्व घड्याळे १ जानेवारी २०१६ वर उलटली, संपूर्ण लोणावळ्यात फटाक्यांची आतषबाजी झाली, तो झगमगाट शहरापेक्ष्या आमच्याच डोळ्यांमध्ये जास्त चमचमला! दुसऱ्या दिवशी पहाटे नववर्षीचा नवसूर्य पाहण्याचा नूतन वर्ष्यातील आमचा पहिला संकल्प आम्ही पूर्ण केला! प्रसाद सोबत पुण्याहून आलेले आणखी तीघे आम्हाला सामील झाले आणि उल्हास दरीतून सुरु होणारा आणि नदीच्या ओबडधोबड पात्रातून वळवळणारा जवळजवळ २५ किलोमीटर चा सुंदर ट्रेक आम्ही पूर्ण केला.
नवीन वर्ष्याची ती दणदणीत सुरुवात एका अविस्मरणीय आठवणीसोबत एक नवी उमेद देऊन गेली आणि त्याच उर्मीमध्ये दुसऱ्या दिवशी कागदावरती काहीतरी गीरगटलं. आज तो कागद अलगद हाती लागला, 'लिहणं' म्हणजे काय हे माहीत नसताना गीरगटलेलं काहीतरी तुमच्याशी share करतोय....
नवीन वर्ष्याची सुरुवात झाली, अगदी दरवर्षी प्रमाणे ! आणि आम्हा सर्वांचे डोळे लागले ते त्या नववर्षाच्या उगवत्या भास्काराकडे. प्रत्येकालाच याला डोळे भरून पाहायचे होते, आगतिक होते सर्वजण, अगदी माझ्याइतकेच.
प्रत्येकालाच हा सूर्य पाहायचा होता, पण रोजप्रमाणे नाही, तर एका नव्या आणि विशिष्ट कोनातून. सूर्य तर तोच होता कि जो मी माझ्या जन्मापासून रोज पाहत आलो आहे, कि जो माझ्या पूर्वजांनीही तोच पहिला आहे, एवढेच नव्हे तर ही पृथ्वी तिच्या स्वतःच्या जन्मापासून पाहत आली आहे. जमिनतरी कुठे बदलली आहे ? तीही तीच आहे. सर्वकाही तेच आहे, मग हे नावीन्य कुठले आहे ? वेगळे काय आहे ? वेगळे तर काहीच नाही, हो, बहुदा आमचा विचार बदलला होता, आमच्या दृष्टीवर एक नवा चष्मा आला होता.
कोणतीही गोष्ट ही special केव्हाच नसते, तर आपण तीला special बनवतो, जेव्हा आपण तसा विश्वास करतो. प्रत्येक क्षण तर सारखाच असतो, पण आपण त्यातील काही मोजके आणि निवडक क्षण खास साजरे करतो. नववर्ष तर एक निमित्त आहे, म्हणूनच तर रोज दिवसभर सोबत असणाऱ्या या सहकार्याला नववर्षाच्या एक तारखेला आपण कवटाळून मीठी मारतो.
आपल्या सोबतही तसेच आहे, काही लोक आपल्यासाठी विशेष असतात, बऱ्याचदा ते विशेषपण त्यांच्यामध्ये असतेच असे नाही. पण आपला विश्वास असतो तसा. म्हणूनच 'दृष्टी' ही महत्वाची आहे. हीच्यामुळे आपण कोणत्याही सामान्य गोष्टीला असामान्य बनवू शकतो, पण तेवढा विश्वास असायला हवा. एक साधा चहासुद्धा आपण खूप आवडीने पितो, जेव्हा तो आपल्या ताईने खास आपल्यासाठी बनवलेला असतो. साध्यातील साधे आणि छोट्यातील छोटे गीफ्ट सुद्धा आपण जीव लावून जपतो, जेव्हा ते कोणी खास व्यक्तीने दिलेले असते. म्हणूनच फक्त असण्यापेक्षा विश्वास असणे मला महत्वाचे वाटते. प्रत्येकाने स्वतःवरही असा थोडा भाबडा विश्वास ठेवायला हवा, यामुळे स्वतःमधील सामान्य गोष्टी असामान्य होतील, आधी स्वतःला पटतील, नंतर जगाला.

- ०२ जानेवारी २०१६

Hey, I am missing Mehul and Sonam !!! Where are they ?
ReplyDeleteRegards
Beautiful.Brought all the memories back.Got hight blood pressure for a moment (kidding).
ReplyDelete