पाहता हे ढगाळलेले नभ
मिटून घेतोय पाकळी मी
मेहनतीने जपलेला गंध माझा
का लोटून द्यावा परक्यांच्या उन्मादी
...अगदी थोड्या वेळेसाठी !
वाऱ्याने सोडलाय लगाम
न करता कसलाही उत्पात
स्थीर होई पर्यंत याचा संताप
शहाण्याने आडोसा घ्यावा पानांच्या छप्परात
...अगदी थोड्या वेळेसाठी !
प्रकृती तितक्याच विकृती इथे
कुणा कुणाशी वैर करावे
जीवनाचे नाव संघर्ष असले तरी
प्रतिउत्तराने स्वतःवर घाव किती करावे
...अगदी थोड्या वेळेसाठी !
किती काळ तरेल वादळ हेही
उगवेल नवसूर्य पुन्हा याची मला हमी
पुन्हा बहरेन मी जोमाने अन् पूर्णत्वाने
सध्या परिक्षा फक्त माझ्या संयमाची
तेही ...अगदी थोड्या वेळेसाठी !

Kuthun suchet re tula....khup mast lihliye poem...👌
ReplyDeleteNice 👌
ReplyDeleteSundar...
ReplyDeleteसुंदर 👍
ReplyDeleteVery nice....👍👌👌
ReplyDeleteVery nice👌👌👌
ReplyDeleteWonderful
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteBeautiful
ReplyDeleteअतिशय सुरेख
ReplyDeleteNice 👌🎉
ReplyDeleteचांगले लिहिले, अप्रतिम.
ReplyDeleteमराठी मे तेरा इतना अच्छा कमेंट.. ! वा वा...
DeleteThank you for comments friends..
ReplyDeleteMast aahe aakashrao
ReplyDeleteChhan jamliy
ReplyDeleteThat was deep
ReplyDeleteKhup sundar ��
ReplyDeleteLai Bhari...
ReplyDeleteMastach ...👌
ReplyDeleteNisargatil pratyek gostit positivity shodhnarya tuzyasarkhya rasik lekhak aani kavilach he suchu shakte.☺�� What a brilliant n nice thoughts you have. Keep going.... Gbu
ReplyDeleteखुप छान आहे कविता 👌 👌 👌
ReplyDeleteWao...i am reading your kavita after so long..it felt like first rain after long summer.keep writing !!:)
ReplyDeleteBy the way,this one is beautiful and soul calming.
Mast ekdum����
ReplyDeleteSuresh👌
ReplyDelete*surekh
Deleteफक्त कवी मनच बोलच शकतं
ReplyDeleteअबोल जिवांच्या व्यथा...
त्यांचं हि जिवन असतं
संकट संघर्षाच्या कथा...
फक्त हे जाणण्यासाठी हवी प्रज्ञा
आणी प्रतिभावंत विचार धारेचे आकाश रुप
सुंदर बोलकी मांडणी धन्यवाद
प्रविण धेडे